Pimpri : फेरीवालाबाबत राज्यभरातील महापालिका स्थितिनिर्देशांक तयार करणार

फेरीवाला कायदा प्रशिक्षण शिबिर  मुंबईत उत्साहात

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र हॉककर्स फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघा तर्फे एकदिवशिय फेरीवाला कायदा प्रशिक्षण शिबिराचे  आयोजन   खारघर नवी मुंबई येथे  करण्यात आले.यावेळी कायदा अमलबजावणीसाठी रस्त्यावरची लढाईसह सर्व पर्यायी मर्गांचा अवलंब करण्याचा  ठराव करत राज्यातील सर्व महानगरपालिकात फेरीवाला कायद्याबाबतचि परिस्थितिचा निर्देशांक तयार करण्याचा निश्चय करण्यात आला .

यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापुरचे दिलीप पवार,  राज्य महासचिव काशीनाथ नखाते ,सहसचिव विनीता बालेकुंद्री,  मुंबईच्या मधुताई बीरमोले, मुख्य समन्वयक मेकंजी डाबरे, पुणेचे रणजीत गाडगीळ, साताराचे लक्ष्मण निकम , रत्नागिरीचे नरेश जाधव , नागपुरचे जे एस  आनंद , औरंगाबादचे सचिन निकम,जळगावचे सुरेश पटेल,आदी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधि सहभागी झाले.

या वेळी नखाते  म्हणाले ” केंद्र सरकारने सन 2014 पथ विक्रेता कायदा केला मात्र  महाराष्ट्र राज्य शासनाला आदेश देउनही अनेक जिल्ह्यांमधे आम़लबजवानी होताना दिसत नाही ,शासनाला हां कायदा मध्ये रस नाही म्हणून नियमावली करताना मोड़तोड़ करून टाळाटाळ करत आहे. अनेक महापालिकेमधील अधिकारी याना कायदाच माहीत नाही अशी स्थिती असल्यामुळे’ राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यात  काम पुढे जावे म्हणून विभागवार बैठका घेणे  अत्यंत गरजेचे आहे” सबका साथ सबका विकास म्हणत सत्तेवर आलेले सरकार सबका या शब्दात येणाऱ्या श्रमिक,गरीब वर्गाचा विसर  सरकारला पडला आहे , स्वच्छ भारत अभियानात फेरीवाला घटकाची महत्वाची भूमिका असताना त्याना प्रशिक्षित करणे सोडून त्यांचेवर अन्यायकारक कारावाई करण्यात येत आहे ” याबाबत मोठ्या लढाईची गरज आहे.”

प्रास्ताविक मेकंजी डबरे यानी केले. सूत्रसंचालन दिनेश कदम यांनी तर आभार उमेश डोर्ले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.