Pimpri: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त

विकास कामांना येणार वेग

एमपीसी न्यूज – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता रविवारी (दि. 26)रात्री संपली आहे. देशात सात टप्यात निवडणुका झाल्याने तब्बल 75 दिवस आचारसंहिता लागू राहिली. आता आचारसंहिता संपल्याने विकासकामांना वेग येईल.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे आयोगाने रविवारी स्पष्ट केले. याबाबतचे पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवले आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आचारसंहिता उठविण्याच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरु करण्याचे आदेश देखील निवडणूक आयोगाने दिले आहेत.

आज (सोमवार) दैनंदिन प्रशासकीय आणि विकास कामांना प्रारंभ होणार असून, आचारसंहितेमुळे अडकलेल्या कामांना आता वेग येणार आहे. महापालिका नियमित काम सुरु करुन निर्णय घेईल. त्यामुळे शहर विकासाला वेग येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.