Pimpri : आचारसंहिता संपली ! विकासकामांना येणार वेग

एमपीसी न्यूज – राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. 30) जाहीर केले आहे. नवनिर्वाचित आमदारांची अधिसूचना जारी केली असून या अधिसूचनेपाठोपाठ बुधवारी सायंकाळी आचारसंहिता उठल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता विकासकामांना वेग येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबर 2019 रोजी लागू झाली होती. 40 दिवस आचारसंहिता लागू होती. आचारसंहितेमुळे विकासकामे थांबली होती. महापालिकेचे कामकाज थंडावले होते. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे कामकाज तहकूब केले जात होते. त्यामुळे महिनाभर विकासकामे रखडले होती. कामकाज ठप्प झाले होते.

आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले आहे. नवनिर्वाचित आमदारांची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेपाठोपाठ बुधवारी सायंकाळी आचारसंहिता उठल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता विकासकामांना वेग येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.