Pimpri: वृत्तपत्रातील लेख, अग्रलेखांनी उलगडणार यशवंतराव चव्हाण यांचा जीवनप्रवास

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या (रविवारी) आणि (सोमवारी) चव्हाण यांच्या संदर्भातील विविध वृत्तपत्रांतील लेख, अग्रलेख यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. याबाबतची माहिती माजी नगरसेवक व साहित्यिक अरुण बो-हाडे यांनी दिली. 

खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात या लेखांचे प्रदर्शन रविवारी आणि सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत आयोजित केले आहे.  माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार आण्णा बनसोडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने त्यांच्या संदर्भातील  विविध वृत्तपत्रांतील लेख, अग्रलेख प्रदर्शनात असणार आहेत.  चव्हाण यांच्या निधनानंतर 1984 नंतर महाराष्ट्रातील प्रमुख  वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले अग्रलेख, तसेच त्यानंतरच्या काळात अनेक मान्यवरांनी लिहीलेले लेख आणि आठवणींचा केलेला संग्रह प्रदर्शनात असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.