BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) पहाटे कोम्बिंग ऑपरेशन करून 32 आरोपी तपासले त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन केले जात आहे. पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे बारा ते तीन या कालावधीत पिंपरी मधील बौद्धनगर आणि भाटनगर या भागात कोम्बिंग ऑपरेशन केले.

या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 32 आरोपी चेक केले. त्यामध्ये 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले. मिळालेल्या आरोपींकडे चौकशी करून त्यांना पोलिसांनी सोडून दिले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, एक पोलीस उपनिरीक्षक, सात पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाची दोन पथकांनी सहभाग घेतला. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांनी भेट दिली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like