Pimpri: दिलासादायक ! शहरातील कोरोना संशयित 122 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह; नऊजण कोरोनामुक्त 

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी एकाचदिवशी 46 रुग्ण पॉझिटीव्ह आले असले, तरी  दुसरीकडे कोरोना संशयित 122 जणांचे रिपोर्ट आज निगेटीव्ह आले आहेत. तर, आज दिवसभरात नऊ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. दरम्यान, 377 जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत. 

शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. तसेच अनेकांचे रिपोर्टही निगेटीव्ह येत आहेत.

शहरातील 122 जणांचे आज रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. चिंचवड- इंदिरानगर, आकुर्डी, च-होली, थेरगावमधील रहिवासी असलेल्या नऊ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त होत ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 120
# पॉझिटीव्ह रुग्ण – 46
#निगेटीव्ह रुग्ण – 122
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 377
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 534
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 77
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 311
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 135
# शहरातील कोरोना बाधित 22 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  16
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 169
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 37074
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 105975

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like