Pimpri: दिलासादायक! आज चारजण ‘कोरोनामुक्त’, 158 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन आज (बुधवारी) आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त होत ठणठणीत झाले आहेत. यामुळे या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 35 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आज शहरातील 158 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील पण, महापालिका रुग्णालयात दाखल अशा 115 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी शहरातील तीन आणि शहराबाहेरील दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या भोसरी आणि खराळवाडीतील चार रुग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे असे दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरातील 110 आणि महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी परंतु महापालिका रुग्णालयात दाखल 5 अशा एकूण 115 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील शहरातील रहिवासी असलेल्या तीघांचा आणि महापालिका हद्दीबाहेरील पण महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांचा अशा पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजरोजी महापालिका रुग्णालयात कोरोनाचे सक्रिय 67 रुग्ण आहेत. तर, शहरातील 10 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 153
# पॉझिटीव्ह रुग्ण – 08
#निगेटीव्ह रुग्ण – 158
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 166
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 233
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 161
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 115
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या –
# शहरातील कोरोना बाधित दहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 5
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 35
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 16972
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 52871

  • पिंपळे निलखचा परिसर सील!
    कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पिंपळेनिलख येथील एस.एस. फर्निचर-गुरुदत्त मेडिकल-भाऊराव कामठे चौक- पाण्याची टाकी-जय मल्हार मेस-बाबासाहेब आंबेडकर पथ-कांबळे प्रॉपर्टीज-पंचशीलनगर बस स्टॉप-कुणाल हाईटस् सोसायटी हा परिसर आज मध्यरात्री 11 वाजल्यापासून सील करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.