Pimpri: दिलासादायक; शहरात आज एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही; 64 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – मागील सलग 12 दिवसांपासून कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळणा-या पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी) सायंकाळी सहापर्यंत एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. याऊलट 14 दिवसांचे उपचार घेऊन एक महिला रुग्ण कोरोनामुक्त होत घरी गेली आहे. तसेच 64 संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहराच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर महापालिका प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. आज सोमवार (दि.18) पासून शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे.

तसेच शहराच्या सीमा 27 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद केल्या आहेत. लॉकडाऊनचे कडक पालन केले जाणार आहेत. दरम्यान, आजपर्यंत शहरातील 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 45
# पॉझिटीव्ह रुग्ण – 00
#निगेटीव्ह रुग्ण – 64
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 45
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 81
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 65
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 62
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 43
#वायसीएममध्ये 37 तर पुण्यात सात, परभणीत एका रुग्णावर उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 1
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 18
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 17564
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 58504

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.