Pimpri: ‘परदेशातून आला म्हणजे कोरोनाचा रोगी होत नाही, सोसायटीतील प्रवेशापासून रोखू नका’; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – केवळ परदेशातून नागरिक आला म्हणजे तो कोरोनाचा रोगी होत नाही. कोरोना बाधित देशातून शहरात आलेल्या नागरिकामध्ये लक्षणे दिसल्यास आयसोलेशन केले जात आहे. पण, लक्षणे नसतील तर चुकीच्या पद्धतीने त्यांना सोसायटीमध्ये प्रवेशापासून परावृत्त करणे योग्य नाही. रुग्ण नसतील. त्यांच्यामार्फत संक्रमण होण्याची स्थिती नसेल. तर, उगाचच समाजाने त्यांच्यावर अडचण निर्माण करु नये. सोसायटीतील प्रवेशापासून रोखू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या लोकांना कोरोनाच्या धास्तीने सोसायटीमध्ये प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, परदेशातून प्रवास करुन अनेक नागरिक आपल्या देशात परत येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात देखील येत आहेत. कोणत्याही नागरिकाची तपासणी होत नाही. तोपर्यंत तो पॉझिटीव्ह आहे, असे म्हणता येणार नाही. केवळ परदेशात प्रवास करुन आल्याने तो कोरोना बाधित होत नाहीत.

कोरोना बाधित देशातून आलेल्या नागरिकांचे विभागामार्फत सर्वेलन्स सुरु आहे. त्यांच्यात लक्षणे दिसल्यास आयसोलेशन केले जात आहे. पण, लक्षणे नसतील तर विनाकारण चुकीच्या पद्धतीने त्यांना सोसायटीमध्ये प्रवेशापासून रोखणे योग्य नाही. त्यांच्यामार्फत संक्रमण होण्याची स्थिती नसेल. तर, उगाचच समाजाने त्यांच्यावर अडचण निर्माण करु नये.

परदेशातून येणा-या नागरिकांची लक्षणे पडताळण्याची कार्यवाही केली जात आहे. परदेशातून शहरात येणा-या नागरिकांची माहिती घेतली जात आहे. लक्षणे निर्माण झाली. तर, त्यांचे द्रव घेतले जात आहेत. केवळ परदेशातून आला म्हणजे कोरोनाचा रोगी होत नाही. त्यांच्यावर सर्व्हीलन्स आणि कॉरेनटायची कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या वाचा

Pune : मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्याची माहिती द्या -सीमा बैस

Pimpri: चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी अन् संपल्यानंतर ‘थिएटर’ निर्जंतुकीकरण करा, महापालिकेच्या सूचना

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची प्रकृती स्थिर

.Pimpri: शहरात कोरोनाचे तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’! (Video)

Pune : सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार -दीपक म्हैसेकर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.