Pimpri: आयुक्तांचा पुढाकार मात्र, नगरसेवकांची उदासीनता!; ‘हँगआउट ‍मिट’द्वारे संवादात मोजक्या नगरसेवकांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने आयुक्तांनी पुढाकार घेऊन आज (शुक्रवारी) ‘हँगआउट ‍मिट’द्वारे नगरसेवकांशी संवाद साधला. मात्र, यामध्ये बोटावर मोजण्या इतक्या नगरसेवकांनी सहभाग घेतला. सुरुवातीला केवळ 12 नगरसेवक सहभागी झाले होते. त्यानंतर काही नगरसेवक सहभागी झाले. 133 पैकी केवळ 25 ते 30 नगरसेवकांनी सहभाग घेतल्याने त्यांची उदासीनता दिसून आली. तर, 133 पैकी 51 नगरसेवकांनी संवादात सहभाग घेतल्याचा महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात दावा केला आहे.

महापालिकेच्या वतीने कोरोना कोविड-19 या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी उपायोजनांबाबत सर्व नगरसेवकांना माहिती देण्यासाठी ‘हँगआउट ‍मिट’ या व्हिडीओ कॉन्फरन्सचे आज (शुक्रवारी) आयोजन केले होते. मात्र, निवडून आलेले 128 आणि स्वीकृत पाच अशा 133 नगरसेवकांपैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या नगरसेवकांनी या संवादात सहभाग घेतला.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसेवकांना माहिती देताना सांगितले की, महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 81 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी 21 रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. लॉकडाऊन चालू असल्याने बेघर, बेरोजगार व परप्रांतीय इतर नागरीकांची उपासमार होऊनये. त्यांना भोजन व इतर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यात सर्वांचा सहभाग महत्वाचे आहे. परप्रांतीय, बेघर, बेरोजगार यांच्यासाठी 11 ठिकाणी निवारा केंद्र करण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे 244 नागरीक राहत असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था तसेच वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनासाठी वायसीएम रुग्णालय निश्चित केले आहे. त्याशिवाय भोसरी रूग्णालयातही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात असून जिजामाता रुग्णालय यासह खासगी रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. या शहरात कोरोना पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळून आला होता. त्यानंतर वाढ होता होता आजरोजी रूग्णांची संख्या 81 वर पोहोचली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार रोखण्यासाठी विशिष्ट उपायोजना केलेल्या आहेत.

लॉकडाऊन व सेल्फ ‍डिस्टन्स आणि नागरीकांनी घरीच राहणे हे आवश्यक उपाय असून त्यात नगरसदस्यांचाही सहभाग ‍मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 20 एप्रिल पासून शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृहात क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे.

बाधित रुग्नांमध्ये पुरूषांचे 49 टक्के तर महिलांचे 29 टक्के प्रमाण आहे. महापालिकेच्या संपूर्ण रूग्नालयात मोफत फ्ल्यू ओपीडी चालू करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत मोबाईल क्लीनीक चालू करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आणि त्यांच्या हाय ‍रिस्क कंटेनमेंट झोन यांचे जीआयएस मॅपींग केले जात आहे.

नागरीकांना लॉकडाऊन दरम्यान भेडसावणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्मार्ट सारथी मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. महापालिकेतर्फे कोरोना आजाराशी संबंधित गोष्टीचे संनियंत्रण करण्यासाठी वॉररूमची स्थापणा करण्यात आल्याचेही आयुक्त हर्डीकर यांनी व्हीसीद्वारे सांगितले.

वैद्यकीय व्यवसायिक, ‍विविध खासगी पॅथालॉजी व्यवसायीकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले असून फेसबूक, ट्यूटरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरोघरी सर्वेक्षणामध्ये हस्त पत्रिका वाटप केले जात आहेत. शहर पूर्णपणे कंटोमेंट झोन घोषित करण्यात आले असून पॉझिटीव्ह केसेस आढळल्यास 1804 कंटन्मेंट झोन ‍निश्चित करण्यात आले आहेत.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.