Pimpri: कंपन्या, ‘एनजीओं’नी पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा; स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या भंयकार पुरामुळे सात हजार नागरिकांचे स्थलांतर केले आहे. 300 कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी शहरातील कंपन्या, सामाजिक संस्थांनी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात द्यावा. वस्तू, कपडे आणि आर्थिक स्वरूपाची मदत करावी, असे आवाहन महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती विलास मडीगेरी यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये 3 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत धरणातील पाण्याचा विसर्ग, कोसळणारा पाऊस यामुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे 7 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत.

  • याबाबतची माहिती देताना मडीगेरी म्हणाले, घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना जवळच्या महापालिका व इतर शाळांमध्ये राहण्यची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका आपल्या परिने नागरिकांची सोय करत आहे. परंतु, पुरामुळे झालेली हानी मोठी आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी मदतीची गरज आहे.

सात हजार पुरग्रस्त नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण यासाठी टाटा मोटर्स, बजाज, थिसेन ग्रुप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, एक्साईड बँटरी, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन यांनी व्यवस्था केली.

  • सध्या पुरपरिस्थिती निवळत असून पुरग्रस्त नागरिकांना त्यांच्या राहत्या घरी जाण्यास अजून वेळ लागणार आहे. त्यामुळे आणखी मदतीची गरज आहे. या गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी खासगी कंपन्या, उद्योजक, एनजीओ, नागरीक, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, बचत गट व गणेश मंडळे यांनी पुढे यावे, असे आवाहन मडीगेरी यांनी केले आहे

पुरग्रस्तांना अन्न धान्य, सतरंजी, चादर, ब्लँकेट, कपडे या मदतीची आवश्यकता आहे. मदत करण्यासाठी महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर (9689931280), आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल( 7276771077)यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.