Pimpri : सलून व्यवसायिकांना नुकसान भरपाई द्या – डॉ. अभिषेक हरिदास

Compensate salon professionals - Dr. Abhishek Haridas

एमपीसी न्यूज – सलूनची दुकाने सुरु करण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खर्च करुनही दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धरसोड वृत्तीमुळे सलून दुकान चालकांचे जे आर्थिक नुकसान झाले आहे ते भरुन द्यावे, अशी मागणी केयर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभिषेक हरिदास यांनी केली.

महापालिकेने सलून व्यवसायिकांना अटी व शर्तीवरती दुकान सुरु करण्याची परवानगी दिली. यासाठी परवान्याची अटही टाकण्यात आली. बर्‍याच दुकानचालकांनी अटी व शर्तीची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारचे खर्चही केले तसेच काही लोकांनी करही भरला. मात्र, पुन्हा सलून दुकाने सुरु करण्यास मनाई करण्यात आली.

त्यामुळे एवढा खर्च करूनही सलून दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आधीच कोरोना महामारीमुळे जवळपास तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे सलून व्यवसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुकान सुरु करण्यासाठी अटी व शर्ती पूर्ण करताना दुकानदारांना पुन्हा खर्चाला तोंड द्यावे लागले.

मात्र, अचानक राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने सलून दुकाने बंद ठेवण्याचे सांगितल्याने सलून दुकानदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे सलून व्यवसायिकांचे जे आर्थिक नुकसान झाले ते भरुन द्यावे, अशी मागणी हरिदास यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.