-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : वाहनांच्या तोडफोडप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – घातक शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री सव्वा दहाच्या सुमारास संजय गांधीनगर, काळेवाडी ब्रिजजवळ पिंपरी येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

दीपक कुमार राऊत (वय 23, रा. संजय गांधीनगर, पिंपरी), अक्षय भोसले (रा. पवनानगर, काळेवाडी), रसुल्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अमोल खेडकर, सुरज ताथवडे, अरुण (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरख बाबुराव देवकर (वय ३५, रा. संजय गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी संजय गांधीनगर येथे आले. त्यांनी शिवीगाळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. त्यानंतर, फिर्यादी देवकर यांच्या रिक्षा आणि परिसरातील अन्य वाहनांची लाकडी दांडके आणि कोयत्याने तोडफोड केली. देवकर यांच्याकडे लाकडी दांडके आणि कोयत्याने इशारा करून ‘आमच्यामध्ये कोणी आले तर जीवे मारून टाकू’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.