Pimpri: पावसाळ्यापूर्वी अर्धवट स्थितील विकास कामे पूर्ण करा; आयुक्तांचे आदेश 

Pimpri: Complete pending development work before monsoon; Ordered PCMC Commissioner

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील अर्थवट स्थितीतील विकास कामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकादायक ठरु शकतील अशी बांधकामे, पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. इमारती, रस्ते, गटार, नाले, पुल व प्रकल्प, उद्याने अशा स्थापत्य विभागातील आठ क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, स्थापत्य उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनि:सारण विभागातील अशी 105 कामे तातडीने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. रविवारनंतर चौथा टप्पा सुरु होईल. लॉकडाऊन असल्यामुळे महापालिकेची विकास कामे ठप्प आहेत. परंतु, पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. शहराच्या विविध भागात अर्धवट स्थितीतील विकास कामे, आजूबाजूच्या बांधकामांना धोकायक ठरु शकतील अशी बांधकामे, रस्ते, गटर, नाले, पूल व प्रकल्पासाठी केलेले खोदकामे अशा ठिकाणी पाणी साचेल. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे जीवितास धोकादायक स्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर स्थापत्य विभागातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, बीआरटीएस, बीएसयूपी, उद्यान, पर्यावरण, पाणीपुरवठा, जलनि:सारण या विभागाअंतर्गत येणाऱ्या विकासकामांबाबतचा आढावा घेऊन पावसळ्यापूर्वीची कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये अर्थवट स्थितील जोत्यांचे बेसमेंट, संरक्षक भिंत बांधकाम, भुस्खलन बांधकामे, आजूबाजूच्या इमारती, रस्ते, पाणी साचून धोकादायक ठरु शकतील. डासांची निर्मिती वाढेल अशी कामे, लॉकडाऊनपुर्वी सुरु असलेली अत्यावश्यक जलवाहिन्या, नाल्यांची कामे सुरु करावीत.

पावसाळी गटरची अर्थवट कामे, राडारोडा उचलणे, रुग्णालये, महापालिका इमारती संदर्भातील कामे, पर्यावरण, पाणीपुरवठा विभागातील आवश्यक कामे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. ही कामे करणा-या मजुरांची संपूर्ण काळजी घ्यावी. राहण्याची, भोजनाची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.