Pimpri: शहरात पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करावीत -नाना काटे

Pimpri: PCMC Should do pre-monsoon work in the city immediately - Nana Kate

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. महापालिकेचा वैद्यकीय विभाग त्याविरोधात लढत आहे. परंतु, पावसाळा ऋतू जवळ आला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी दरवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात सापडत आहेत. कोरोनाच्या विरोधात मनपा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे, शहरात नागरीकांचे सर्वेक्षण करणे, बेघर,बेरोजगार नागरीकांना जेवण पुरविणे नागरीकांमध्ये कोरोना विरोधात जनजागृती करणे इत्यादी प्रयत्न करीत आहे.

परंतु आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नियमित शहरात होणारी विविध कामे प्रलंबित आहेत. शहरातील छोटे मोठे नाले साफसफाई करणे, शहरातील रस्ते खाजगी कंपनींच्या केबल्स टाकण्यासाठी खोदाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी कच-यांचे ढीग ठिकठिकाणी साठलेले आहेत, ते पावसाळा सुरु होण्यापूर्वी हटविणे गरजेचे आहे.

जलनिस्सारण नलिका टाकण्याची कामे जिथे अर्धवट झालेली आहेत ती पूर्ण करणे, गटारे साफसफाई करणे, तसेच ऐन पावसाळ्यात वाढलेल्या झाडांच्या फांद्या महावितरणच्या लाईनवर पडून विद्युत पुरवठा खंडीत होणे, वाहतूक विस्कळीत होणे वेळप्रसंगी अपघात होऊन वित्त व जिवित हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील वाढलेल्या झाडांची छाटणी करणे. इत्यादी मान्सूनपूर्व कामे पावसाळा सुरु होणेपूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीमध्ये संचारबंदी 17 मे पर्यंत असली. तरी शहरातील कोरोना विषाणू संसर्गाची परीस्थिती पाहता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये संचारबंदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचारबंदी असली तरी सदरची मान्सूनपूर्व कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा शहरातील नागरीकांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गंत प्रलंबित असणारी कामेही मार्गी लावण्यात यावीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.