Pimpri: संगीतकार अवधुत गुप्ते यांना ‘आशा भोसले पुरस्कार’ जाहीर; चिंचवड येथे शनिवारी होणार पुरस्काराचे वितरण

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची माहिती

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास देण्यात येणारा यंदाचा ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रसिद्ध पार्श्‍वगायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांना आज (शुक्रवारी) जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुढील शनिवारी (दि. 14) सायंकाळी साडे पाच वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. एक लाख 11 हजार रुपये रोख, शाल व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे अध्यक्ष सचिन ईटकर, नाट्य परिषदेच्या शिरुर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, कोथरुड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे उपस्थित राहणार आहेत.

नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे 2002 पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जात आहे. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकार आणि गायकास हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे अठरावे वर्ष आहे. अठरावा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांना जाहीर झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.