Pimpri : मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसचा महापालिकेवर धडक मोर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत शहर काँग्रेसने आज (गुरुवारी) महापालिकेवर धडक मोर्चा काढला.

काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात संग्राम तावडे, मयूर जयस्वाल, सुंदर काबंळे, लक्ष्मण रुपनर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोरवाडीतून मोर्चाला सुरुवात झाली होती.

महापालिका हद्दीतील प्रत्येक झोपडपट्टीला फोटोपास देण्यात यावा. 2002 नंतरच्या प्रत्येक झोपडीचा पुन्हा सर्व्हे झालाच पाहिजे. प्रत्येक झोपडीला टॅक्स पावती मिळालीच पाहिजे. झोपडीची हस्तांतर फी रद्द करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.

‘भाजप सरकारच्या धिक्का असो, महापौर, आयुक्तांचा धिक्कार’, मनमानी कारभार बंद करा, झोपडपट्टीवासियांच्या समस्या मार्गी लावा. नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.