BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: काँग्रेसच्या आंदोलनाला पिंपरीत सुरुवात; समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पिंपरीत पुणे मुंबई रस्ता रोखण्याचा प्रयत्न (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस सहित अन्य विरोधी पक्षांतर्फे आज (सोमवारी) देशभरात बंद पाळण्यात येत आहे. पिंपरीत देखील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलनाला सुरुवात केली आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बंदला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे, माजी महापौर कविचंद भाट, माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी यांच्यासह आणि राजेंद्रसिंग वालिया, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, मयुर जयस्वाल यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

समाजवादी कपक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलनकर्त्यांना हटवले.

मोदी आबाद, जनता बर्बाद, दाळ 180 किलो, पेट्रोल 86.91 रुपये लिटर, डिझेल 75.96 लिटर, घरगुती गॅस 880 रुपये, दूध 52 रुपये लिटर असे फलक आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले आहेत.

  

  

HB_POST_END_FTR-A2

.