Pimpri : काँग्रेसने मागविले विधानसभा इच्छुकांचे अर्ज

6 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज करावेत. 6 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांसाठी छापील उमेदवारी अर्ज संत तुकारामनगर, पिंपरी येथील शहर काँग्रेसच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. भरलेले अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय मुंबई येथे पोस्ट, ईमेल, कुरिअर, फॅक्स अथवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत.

या अर्जासोबत सर्वसाधारण वर्गातील उमेदवारासाठी रुपये 15000/- (रुपये पंधरा हजार फक्त) आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी रुपये 10000/- (रुपये दहा हजार फक्त) पक्षनिधी म्हणून ‘डीडी’व्दारे प्रदेश कार्यालयाकडे जमा करावेत, अशीही माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.