BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : काँग्रेस कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त; राष्ट्रवादीच्या अडचणीत भर

विधानसभेच्या आघाडीबाबत आत्ताच आश्वासन देण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

एमपीसी न्यूज – काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यावर लोकसभा निवडणुकीला काँग्रेसकडून आघाडीच्या धर्माचे पालन केले जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीकडून ठेंगा दाखविला जातो. आघाडीचा धर्म पाळला जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभेच्या आघाडीबाबत आत्ताच ठाम निर्णय द्यावा, अशी भूमिका घेत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणूक लढवित आहेत. त्यांचा प्रचार देखील जोरदारपणे सुरु आहे. मात्र त्यांच्या प्रचारापासून मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचे कार्यकर्ते अलिप्त आहेत. राष्ट्रवाडीकडून लोकसभेला आमच्याकडून काम करून घेतले जाते. विधानसभेला मात्र ठेंगा दिला जातो. आघाडी धर्माचे पालन केले जात नाही. काँग्रेस उमेदवाराचे काम केले जात नाही. पुणे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात हीच परिस्थिती आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने काँग्रेसचे खच्चीकरण केले जाते. काँग्रेसला दाबायचा प्रयत्न केला जातो. काँग्रेस संपविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुरक्षित वाटत नाही. त्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विधानसभेच्या आघाडीबाबत आत्ताच ठोस आश्वासन घ्यावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे काम करण्याबाबत वरिष्ठ नेते सांगत नाहीत आणि जोपर्यंत आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अडचणीत भर पडली आहे. यातून मार्ग कसा काढला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.