Pimpri : प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ पिंपरीत काँग्रेसचे आंदोलन 

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेश सोनभद्र येथील आदिवासी कुंटूंबातील हत्या झालेल्या व्यक्तींच्या कुंटूंबीयांना भेटण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना नारायणपूर येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने आज (शनिवारी) पिंपरीत आंदोलन केले. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव बिंदू तिवारी, युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व प्रभारी प्रिया पवार, प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्धीन शेख, असंघटित कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, सज्जी वर्की, भाऊसाहेब मुगूटमल, दिलीप पांढरकर, विशाल कसबे, गौरव चौधरी, शितल कोतवाल, किशोर कळसकर, बाबा बनसोडे, परशुराम गुंजाळ,  संदेश बोर्डे, वसिम शेख आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाही विरोधी व केंद्रातील भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधी घोषणा देत तीव्र निषेध नोंदविला.

सचिन साठे म्हणाले, ”उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकारने बहुमतांच्या जोरावर सुरु केलेली दडपशाही, हुकूमशाही थांबवावी. अन्यथा नागरिक त्यांच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत. सोनभद्र येथील हत्याकांडात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुंटूंबीयांना भेटण्यापासून प्रियांका गांधींना रोखणे म्हणजे लोकशाहीने दिलेल्या नागरी हक्कांची पायमल्ली आहे. पंतप्रधान मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चालवलेली हुकूमशाही व दडपशाही काँग्रेसचे कार्यकर्ते कदापी सहन करणार नाहीत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.