Pimpri : विविध संस्थांच्या वतीने संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था व संघटनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना पिंपळे सौदागरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.

नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाउंडेशन, जयनाथ काटे युवा मंच, कुंदाताई भिसे सोशल फाउंडेशन आणि संदीप नखाते युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मेणबत्तीच्या रूपात वीरपुत्रांचे बलिदान सदैव देशवासीयांच्या मनात उजागर ठेवू जे आपल्या या येणाऱ्या पिढीतले देशप्रेम कधी विझू देणार नाही असे नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले. तसेच यापुढे दरवर्षी 26 नोव्हेंबर या दिवशी असेच आपण एकत्र येऊन या शहीद वीरपुत्रांना नमन करण्यासाठी जमणार असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. यावेळी निर्मला कुटे, जयनाथ काटे, कुंदा भिसे यांनी तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, उन्नती फाउंडेशन चेअरमन कुंदा भिसे आणि संस्थापक संजय भिसे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते तसेच ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन सदस्य, पिंपळे सौदागर हास्य क्लब सदस्य, नवचैतन्य हास्य क्लब सदस्य, परिसरातील सोसायटी कमिटी पदाधिकारी, महिला आणि लहान मुले यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.

जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, विशाखा भगत, रामकृष्ण हराळे, जयश्री गुरव आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शिक्षक रामकृष्ण हराळे, विशाखा भगत आणि जयश्री गुरव यांनी विद्यार्थ्याना संविधानातील महत्त्वाच्या बाबी, संविधानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणार्‍या जवानांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनीही संविधान दिनाबाबत माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यानी व शिक्षिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन केले व प्रतिज्ञा घेण्यात आली.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने निगडी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन एम्प्लॉईजचे फेडरेशनचे पुणे जिल्हाअध्यक्ष कामगार नेते विनोद चांदमारे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधानचे सामूहिक वाचन झाले. यावेळी प्रा. सुमित चांदमारे, लक्ष्मण मुदळे, अॅड. दीपक ओव्हाळ, शेषराव सूर्यवंशी, नारायण वानखेडे, बाबासाहेब कांबळे, पंढरीनाथ खिल्लारे, प्रकाश साळवे, बलभीम सोनकांबळे. आत्माराम सोनकांबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.