Pimpri : पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अॅड. विजय भोसले, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. नाना रसाळ, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. मोनिका सचवाणी, अॅड. संतोष मोरे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. रामचंद्र बोराटे आदी उपस्थित होते.

अॅड. पी. एस. कांबळे म्हणाले की, देशाचे संविधान हाच आपला अभिमान असून त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य घटनेची प्रत माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी पिंपरी-चिंचवड बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर यांना देण्यात आली. यावेळी अॅड. स्मिता लांडे, अॅड. गोरख कुंभार. अॅड. सुनील कड, अॅड. योगेश थांबा, अॅड. किरण पवार, अॅड. आतिश लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी अॅड. मनीषा महाजन, अॅड. किरण पवार, अॅड. सुनील कड, अॅड. आतिश लांडगे, अॅड. सुनील माने, अॅड. पी. एस. कांबळे, अॅड. जिजाबा काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 26/11 मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गोरख कुंभार यांनी केले. स्मिता लांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.