Pimpri: महापालिकेतर्फे संविधान दिनानिमित्त सोमवारी प्रबोधनात्मक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त येत्या सोमवारी (दि.26) संविधान जनजागृतीपर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

पिंपरीतील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, सभागृह नेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेता दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.

सोमवार (दि. 26) सकाळी दहा वाजता महापालिका मुख्य कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता उद्‌घाटन झाल्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन होणार आहे. त्यानंतर ”आमचा अभिमान, आमचे संविधान” हा प्रबोधनात्क कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी आठ वाजता जॉली मोरे प्रस्तुत ‘वुई द पिपल’ या संविधान जनजागृतीपर प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.