Pimpri : कविसंमेलन आणि प्रबोधनपर कार्यक्रमांनी संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – Dr. Vinayak Pawar, Prof. Prashant More, Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, Constitution Dayविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 27 नोव्हेंबर रोजी ‘’आवाज संविधानाचा’’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनात प्रख्यात कवी प्रा. प्रशांत मोरे, डॉ. विनायक पवार, शमिभा पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी, प्रवीणकुमार यांनी सहभाग घेतला.

प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘आम्ही शिवाजीची तलवार, भीमाईची ललकार, क्रांतिवीराचे शूरवीर, शाहूबाची समता, गाडगेबाबांची एकता’ ही कविता सादर करून सामाजिक सलोख्याचा संदेश देत महामानवांना जातीच्या विळख्यात वाटून न घेण्याचा संदेश दिला. तसेच त्यांनी ‘राघू एकला राहीन, याद मैनेची येईन’ ही एक प्रेमकहानी सांगणारी मार्मिक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

डॉ. विनायक पवार यांनी ‘काय शिकलो असतो भीमा, तू शिकला नसता तर’ ही कविता सादर करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जाणीव करून दिली तर ‘तू पाषाणाची ढाल, तू जीवाघावाने चाल, तू आभाळाची शान, तू धरतीवरून विशाल बा भीमा’ ही कविता सादर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

शमिभा पाटील यांनी ‘मिस्टर आंबेडकर तुम्ही जबरदस्त ग्रंथ लिहीलात’ ही कविता सादर केली तर ‘करता आलं तर एवढंच करा’ ही राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी कविता सादर केली.

Pimpri : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

डॉ. स्वप्नील चौधरी यांनी कर्जबाजारी बापाच्या मुलाची व्यथा मांडणारी ‘गण्या’ नावाची कविता सादर करून उपस्थितांना भावूक (Pimpri) केले. तर ‘चला दंगल समजून घेऊ’ या कवितेच्या माध्यमातून तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकावणाऱ्यांना शाब्दिक चाबुक दिला.

प्रवीणकुमार यांनी ‘संविधान आता जपा यार हो’ ही कविता सादर करून भारतातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचे महत्व समजून घेतले पाहिजे असा संदेश दिला तर ‘फाटक्या जिंदगीला तू कोट दिला, तहानलेल्या पाखरांना तू घोट दिला’ ही कविता सादर करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला कवितेच्या माध्यमातून सलाम केला.

या कविसंमेलनाचे निवेदन रोहित शिंगे आणि काजल कोथळीकर यांनी केले. दरम्यान, कविसंमेलनानंतर मंजुषा शिंदे, संजय गोळे आणि धीरज वानखेडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्राचे ख्यातनाम लोकगायक मिलिंद शिंदे यांच्या बहारदार आवाजाने आणि संविधानावर आधारित प्रबोधनपर गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि संविधानाचा जागर केला. अशा विविध कार्यक्रमांनी संविधान दिनानिमित्त आयोजित प्रबोधन पर्वातील दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.