Pimpri : संविधान सन्मान फेरीचे सोमवारी आयोजन

एमपीसी न्यूज – संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान सोहळा समितीच्या वतीने येत्या सोमवारी (दि.26) शहरात ‘संविधान सन्मान फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे. 

पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी नऊ वाजता या फेरीला सुरूवात होणार आहे. ही फेरी पॉवर हाऊस चौक, अशोक थिएटर, साई चौक, आर्य समाज मार्गे रिव्हर रोड, अहिल्यादेवी पुतळा, मनपा भवनासमोर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फेरीचा समारोप होणार आहे.

यावेळी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचे ‘भारतीय संविधानाचा सन्मान कशासाठी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या फेरीमध्ये जास्तीत-जास्त दुचाकी आणि चारचाकी चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मानव कांबळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like