Pimpri : विविध मागण्यांसाठी बांधकाम मजुरांचे आंदोलन मोर्चा 

एमपीसी न्यूज –  बांधकाम मजुरांच्या विविध मागण्यांसाठी आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बांधकाम मजुरांनी आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

कष्टकरी कामगार पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी  भिमशंकर शिंदे , प्रल्हाद कांबळे , धर्मराज जगताप , विक्की तामचिकर , बळीराम काकडे , भागवत  सोनकांबळे , बालाजी शिंदे , ललित वाघमारे , वत्सला पाटकर, पुष्पा ओव्हाळ आदी उपस्थित होते

_MPC_DIR_MPU_II

या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले  बांधकाम मजुरांसाठी सरकारने इमारत व इतर बांधकाम मजूर कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे मंडळात आज रोजी सात हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. या पैशाचा उपयोग बांधकाम मजुराच्या कल्याणकारी योजनांसाठी करण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने कामगार खात्या अंतर्गत एक हजार कोटींच्या निविदा काढल्या असून यात कामगारांना सेफ्टी साधन पुरविणे,मध्यान्ह भोजन देणे आदी योजनांचा सहभाग आहे, सेफ्टी साधन पुरविणे हि बिल्डरची जबाबदारी आहे ,आणि बिल्डरांनी सेफ्टी साधन पुरवावी हे त्यांना कायद्याने बंधनकारक आहे .असे असताना सरकारच्या वतीने सेफ्टी साधन देऊन बिल्डरांचा फायदा केला जात आहे , या कामात जास्तीच्या निविदा कडून ठेकेदाशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे.

या बरोबरच  मजुरांना बांधकाम  साईटवर जाऊन मध्यान्ह भोजन देण्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, प्रत्येक साईटवर जाऊन मजुरांना भोजन देने खर्चिक व वेळ कडू पानाचे आहे,मध्यान भोजन कसे आणि कोठे देणार हे  शक्य नाही  मध्यान भोजन देण्याऐवजी ज्या दराने प्रत्येक व्यक्तीची भोजनाची रक्कम ठेकेदारास दिली जाणार आहे,ती रक्कम ठेकेदारास न देता बांधकाम मजुरांच्या बैंक खात्यात जमा करावी या पैशातून बांधकाम मजूर मध्यान व रात्रीचेही चांगले जेवण घेऊ शकतात. यामुळे या निविदा रद्द करून बांधकाम मजुराच्या खात्यावर हे पैसे जमा करावेत अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायत वतीने अध्यक्ष,कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले.”नोंदणी झालेल्या बांधकाम मजुरांना अवजारे खरेदीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप तातडीने करण्यात यावे , बांधकाम मजुरांसाठी घरकुल योजना राबवावी , महिलांना बाळंतपनात चार महिन्याची सुट्टी देहून त्यांना चार महिन्याचे वेतन देण्यात यावे , मजुरांच्या मुलासाठी  फिरत्या शाळा सुरू कराव्यात , या सहा ईतर विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथील आंदोलन नंतर कामगार कार्यलयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.