BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या कंटेनरचा अपघात

एमपीसी न्यूज – रस्ता चुकलेल्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे भरधाव वेगात आलेली कार कंटेनरला धडकली. हा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या ट्रकला मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. हे अपघात पिंपरी मधील मोरवाडी चौकात आज (रविवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास झाले.

निगडीहून पुण्याच्या दिशेने एक कंटेनर जात होता. कंटेनर मोरवाडी चौक येथे ग्रेड सेपरेटरमध्ये आला असता चालकाला रस्ता चुकल्याचे जाणवले. त्यामुळे कंटेनरचालकाने अचानक ब्रेक लावले. त्यावेळी कंटेनरच्या मागून एक कार जात होती. अचानक ब्रेक लावल्याने कार कंटेनरला मागच्या बाजूने धडकली. या अपघातात कारमधील एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. हा अपघात पाहण्यासाठी पुणे-निगडी रोडने जाणारा एक ट्रक सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास थांबला. या ट्रकला मागून येणा-या दुस-या ट्रकने धडक दिली. दुस-या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3