Pimpri: शहरातील 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’ झोन, 63 दिवसांत 175 जणांना कोरोनाची लागण

Pimpri: Containment zone in 29 areas in the city, 175 people infected with corona in 63 days

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे  ‘कंटेन्मेंट’  झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहे. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. तथापि, ‘कंटेन्मेंट’  झोन क्षेत्रातूनही काही नागरिक बाहेर पडताना दिसून येतात. दरम्यान, 10 मार्च ते 13 मे या 63 दिवसात शहरातील 175 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. राज्यातील पहिला रुग्ण शहरात आढळला होता. 10 मार्च 2020 रोजी पहिल्यादिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. 10 मार्च ते 13 मे या 63 दिवसादरम्यान शहरातील 175 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार घेणारे असे एकूण 194 जणांना लागण झाली आहे.

शहरातील ज्या भागात रुग्ण सापडतील, वाढतील,  तो भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन घोषित केला जात आहे. महापालिकेकडून शहरातील  ‘कंटेन्मेंट’ झोनची माहिती दररोज दिली जाते. आज दिलेल्या माहितीनुसार शहरातील 29 भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे ही 29 ठिकाणे ‘कंटेन्मेंट’ झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आहेत.

शहरातील ‘ही’ 29 ठिकाणे आहेत ‘कंटेन्मेंट’ झोन!

पिंपरी वाघेरे येथील तपोवन रोड, खराळवाडी, पिंपळे गुरवतील जगताप कॉम्पलॅक्स, शिवनेरी कॉलनी, विनायकनगर, पिंपळे निलख येथील शिवाजी चौक, पिंपळे सौदागरमधील शुभश्री गृहनिर्माण सोसायटी,  जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी, थेरगावातील 16 नंबर बसस्टॉप, तापकीर चौक, कस्पटे वस्ती, दत्तनगर, चिंचवडमधील इंदिरानगर, मोहननगर, काळेवाडी

भोसरीतील गुरुविहार सोसायटी, हुतात्मा चौक,  लांडगेनगर, मोशीतील गंधर्वनगरी, बनकर वस्ती, वुड्स विले, दिघीतील विजयनगर, तनिष्क आयकॉन, च-होलीतील निकम वस्ती, साठेनगर,   रुपीनगर, तळवेडीतील न्यु अँजल स्कूल, ताम्हाणे वस्ती, संभाजीनगर येथील बजाज स्कूल परिसर हा भाग  ‘कंटेन्मेंट’ झोन मध्ये आहे.

या परिसरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या परिसराच्या सीमा व बाहेर पडणारे सर्व प्रमुख रस्ते बंद असून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.