Pimpri : लॉकडाऊन 3.0 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 21 भागात कंटेन्मेंट झोन!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. हा कालावधी 4 मे पासून 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 भागात कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत.

कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या भागातून बाहेर अथवा बाहेरील भागातून आत जाता येणार नाही. पुढील आदेशपर्यंत हा भाग सील करण्यात आला आहे. आजवर शहरात कोरोनाची लागण झालेले 121 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर शहरात पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्णांवर पिंपरी आणि भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरात 21 ठिकाणी केलेले कंटेन्मेंट झोन खालीलप्रमाणे –
# खराळवाडी परिसर, पिंपरी –
जामा मस्जिद, खराळवाडीतील गिरमे हॉस्पिटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिधा ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, ओरियंटल बँक, सिटी प्राईड हॉटल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल

# पीएमटी चौक, भोसरी –
पाटील हॉस्पिटल, पीएमटी चौक, मारुती मंदिर, पीसीएमसी पाणी टाकी, भोसरी जुने हॉस्पिटल, विश्वविलास बिर्याणी हाऊस

# गुरुदत्त कॉलनी, भोसरी-
भोसरी- आळंदी रोड, बिकानेर स्वीटस्‌, एच पी पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, भारत पेट्रोल पंप, दुर्वांकुर लॉन मागील बाजू, न्यु मिलान बेकरी, हरी ओम स्वीट, महा-ई सेवा केंद्र, ममता स्वीट, आनंद हॉस्पिटल

# रामराज्य प्लॅनेट परिसर, कासारवाडी –
सीएमई हद्द, सेवन ऍप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस

# गणेश नगर परिसर, दापोडी-
पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, माता शितलादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कुल

# शास्त्री चौक, भोसरी-
संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, परफेक्‍ट इलेक्‍ट्रिल, व्यंकटेश मेडिकल, महानगर को ऑप. बँक, भोसरी आळंदी रोड

# तनिष्क ऑर्किड, चऱ्होली –
तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द

# कृष्णराज कॉलनी, पिंपळे गुरव –
पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा

# नेहरुनगर बस डेपो, नेहरूनगर –
जनता सहकारी बँक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबादी बिर्यानी हाऊस

# कावेरीनगर पोलीस लाइन, वाकड –
बीएसएनएल टेलिफोन एक्‍सचेंज, सेसेम शाळा रस्ता, इंफन्ट जेसस हायस्कूल, अण्णाभाऊ साठे नगर

# रुपीनगर–तळवडे –
दिपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती – शक्ती बस डेपो

# गंधर्वनगरी परिसर, मोशी –
जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, पीएएमयू हायड्रोलिक्स, मोशी कचरा डेपो, पुणे नाशिक हायवे

# विजयनगर परिसर, दिघी –
शिवशंकर आपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड, व्ही आर एल कुरिअर सर्व्हिस

# तनिष्क आयकॉन परिसर, दिघी –
पाण्याची टाकी, कृष्ण आंगण कॉमप्लेक्‍स, ओम साई मिसळ, आळंदी रोड, सुदामा भेळ

# मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी –
मुळा नदी, सीक्‍यूएई परिसर, कामटे फुड्‌स, गणेश मंदिर, इंडियन ऑईल पेट्रोल पंप

# तपोवन रोड परिसर , पिंपरी वाघेरे –
सुखवानी सिटी, व्होडाफोन स्टोअर, नंद किराणा स्टोअर्स, ज्ञानेश्वर जनरल स्टोअर्स, कापसे चौक , वाडेकर मिसळ

# 16 नंबर बसस्टॉप परिसर, थेरगाव –
औंध रावेत बीआरटी रोड, प्रोबस सॉफ्टवेअर प्रा. लि., अक्षय पार्क सोसायटी , प्रेम कुल्फी सेंटर

# शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख –
एस. एस. फर्निचर, गुरुदत्त मेडीकल, बाबुराव कामठे चौक, पाण्याची टाकी, बाबसाहेब आंबेडकर पथ, कांबळे प्रॉपर्टीज

# इंदिरा नगर परिसर, चिंचवड
बीएसएनएल स्टाफ कॉर्टर भिंत, महिंद्रा टू व्हीलर, चिखली कस्पटे वस्ती बीआरटीएस रोड, सरस्वती को-ऑप. बॅंक, डबल ट्री हिल्टन, कॉर्पोरेशन बॅंक, एएसएमएस कॉलेज, तेजस एंटरप्रायजेस, सायन्स पार्कच्या मागील बाजू

# शुभश्री रो हाऊस परिसर, पिंपळे सौदागर –
कुणाल आयकॉन रोड, एमएसईबी ऑफिस, ओम दत्तराज मंदिर, रोज वुड सोसायटी, सोमनाथ स्क्रॅप सेंटर, ओमचैतन्य डेअरी, पकवान स्विटस

# साठ फुटी रोड, पिंपळे गुरव-
तुळजा भवानी मंदिर, भालचंद्र हॉस्पिटल, निलम सुपर मार्केट, गणेश मंदिर, माऊली हॉटेल, श्रीगणेश डेअरी, जयश्री स्वीटस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.