Pimpri : सलग अठरा तास शिवछत्रपती साहित्य वाचनासाठी सहभाग घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका व बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी 18 व 19 फेब्रुवारी रोजी सलग अठरा तास शिवछत्रपती साहित्य वाचन उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आगाऊ ऑनलाइन नावनोंदणी करावी. या उपक्रमामध्ये विविध शाळा-महाविद्यालयातील सर्व वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. महापौर उषा ढोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी याबाबतची माहिती दिली.

यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नामदेवराव जाधव लिखित ‘शिवाजी- द मॅनेजमेंट गुरु’ हा ग्रंथ वाचनासाठी देण्यात येणार आहे. यामध्ये या ग्रंथाचे वाचन, त्यावरील लिखाण व वक्तृत्व अशा तिन्ही बाबींचा समावेश आहे. हा उपक्रम नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उपक्रमाला मंगळवारी दुपारी चार वाजता सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चहा, अल्पोपाहार तसेच भोजन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र व लिहिताना आधारासाठी पॅड किंवा जाड पुठ्ठा आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांमध्ये विविध शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

ऑनलाइन नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी खालील Link चा https://surveyheart.com/form/5e3a974b024ac803a9bafca3 वापर करावा. तसेच प्रा. जितेंद्र वडशिंगकर –   9881032833, संतोष ढोरे  9890002326 आणि प्रा. भरत कानगुडे 9890106937 यांच्याशी या मोबाईलनंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.