Pimpri : उद्यान देखभालीचे काम करणा-या संस्थांना पुन्हा मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या देखभालीचे काम करणा-या खासगी संस्थाना मुदतवाढ देण्याचा सपाटा सुरुच आहे. आज पुन्हा 21 संस्थांना तीन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी येणा-या खर्चाला मंगळवारी(दि. ) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची 175 उद्याने आहेत. त्यापैकी 41 उद्यानाची देखभाल महापालिका करते. तर, 112 उद्यानाच्या देखभालीसाठी खासगी संस्थांची नेमणूक केली आहे. यापैकी अनेक खासगी संस्थाच्या निविदांची मुदत संपली आहे. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रीया राबविणे गरजेचे होते. मात्र, उद्यान विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया राबविली नाही. गेल्या काही दिवसांपासून त्याच संस्थाना मुदतवाढ दिली जात आहे. यावरुन मागील स्थायी समिती सभेत उद्यान विभागाला धारेवर धरले होते. तसेच उद्यान अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु, तरीही उद्यान देखभालीचे काम करणा-या संस्थांना मुदतवाढ दिली जात आहे.

देखभालीच्या मुदत संपलेल्या 21 संस्थांना आज पुन्हा तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत निविदा कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे. नजीकच्या काळात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम असल्याने कर्मचा-यांच्या निवडणूक कामकाजासाठी नेमणूक होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत पूर्वीच्याच ठेकेदारांची मुदत वाढविणे आवश्यक आहे. अथवा निविदा अंतिम होईपर्यंत या संस्थांना मुदतवाढ देणे आवश्यक आहे. त्यामुळे 21 उद्यानाच्या कामांना निविदा कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ आणि त्यासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मान्यता दिली.

या संस्थांना दिली मुदतवाढ

तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी – दुर्गादेवी उद्यान
तावरे फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हीस प्रा. लि – मारुती मंदीर उद्यान
तावरे फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हीस प्रा. लि – संत कबीर बाग
तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी -श्री संत ज्ञानेश्वर उद्यान आ.क्र 562
तुळजाभवानी सर्व्हीसेस – कै. बी.डी. किल्लेदार उद्यान
निसर्ग लॅण्डस्केप सर्व्हीसेस – राजेश बहल उद्यान
अथर्व स्वयंरोजगार सहकारी संस्था – ए.पी.जे.अब्दुल कलाम उद्यान
स्वामी विवेकानंद स्वयंरोजगार संस्था – संत शिरोमनी सावता माळी उद्यान
जी.बी. इंटरप्रायजेस – कै. हरिभाऊशेठ दिनाजी वाघेरे उद्यान
तुळजाभवानी सर्व्हिसेस – कै. भिमाबाई हनुमंतराव मडेगिरी उद्यान
निसर्ग लॅण्डस्केप सर्व्हिसेस – कै. सखुबाई गयाजी गवळी उद्यान
अथर्व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था – सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान
तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी – शिवाजी पार्क पेठ क्रमांक 18
बापदेव महाराज स्वयंरोजगार संस्था – महात्मा फुले उद्यान, आनंदाश्राम मोरवाडी,गोविंदराव भिकू पांढरकर उद्यान, गंगाई बालोद्यान,
तावरे फॅसिलीटी मॅनेजमेंट – गणेश, स्वामी समर्थ, माता अमृतानंदमयी उद्यान
सावित्री महिला संस्था – जय सिताराम उद्यान, महादेव मंदिर उद्यान
तुळजाभवानी सर्व्हिसेस – दिघी स्मशानभूमी, शीतल बाग
श्रमिक स्वयंरोजगार संस्था- अम्ब्रेला पार्क, रायरेश्वर, कृष्णमंदिर, बुद्ध मंदिर, विघ्नहर्ता उद्यान, मीनाताई ठाकरे उद्यान, श्री साईनाथ उद्यान,

निसर्ग लॅण्डस्केप सर्व्हिसेस – भक्ती-शक्ती उद्यान ते बिजलीनगर उड्डाणपुलापर्यंत स्पाईनरोड प्राधिकरण, सेक्टर 23, 24, 26, 27 मधील मध्य दुभाजक, वेणुनगर प्रथमेश सोसायटी रस्ता, काळा खडक ते भूमकर चौक देखभाल व संरक्षण करणे

या संस्थांना 9 जानेवारी पासून 8 मार्च 2019 पर्यंत तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.