Pimpri: अटींचा भंग केल्याने ठेकेदार सहा वर्षासाठी काळ्या यादीत

Pimpri: Contractor blacklisted for six years for breach of conditions कर्तव्याचे पालन केले नाही. त्यामुळे ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त केली. निविदाही रद्द केली आहे.

एमपीसी न्यूज- सांगवीतील कचरा संकलन केंद्रामध्ये बसविलेल्या बायो कंपोस्टिंग प्रक्रिया प्रकल्पाचे चलन देखभाल दुरुस्तीच्या निविदेच्या कामातील अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याने पालिकेने इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदारावर कारवाई केली आहे. त्यांची अनामत रक्कम जप्त करुन ही निविदा रद्द करण्यास आणि यापुढे अशा प्रकारच्या कामाच्या निविदा भरण्यास सहा वर्षासाठी अपात्र केले आहे. पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी कारवाई केली आहे.

पिंपरी महापालिकेने सांगवी येथील कचरा संकलन केंद्रामध्ये जमा होणा-या ओल्या कच-याची त्याच प्रभागात विल्हेवाट लावण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पाच टन क्षमतेचे बायो कंपोस्टींग प्रकल्प बसविण्याचे काम तळवडेतील इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदाराला 30 जानेवारी 2016 मध्ये दिले आहे.

संकलन केंद्रामध्ये गोळा होणा-या ओल्या कच-यावर विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पावर नियंत्रण ठेवणे, कामकाजात सुसूत्रता आणि योग्य समन्वय राखण्यासाठी प्रकल्पाचे चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज ‘ह’ क्षेत्रीय अधिका-यांकडे सोपविले आहे.

क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत यांनी इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदार संस्थेच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे या संस्थेला कामातून मुक्त करावे. त्यांच्या जागी अन्य संस्थेची नेमणूक करण्याबाबत कळविले होते.

त्यानुसार निविदा अटी-शर्तीचे अवलोकन करता सयंत्र चालविण्याची जबाबदारी इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदार संस्थेकडे आहे. त्यांनी निविदा अटी-शर्तींचा भंग केला आहे.

कर्तव्याचे पालन केले नाही. त्यामुळे ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त केली. निविदाही रद्द केली आहे. यापुढे अशा प्रकारच्या कामाच्या निविदा महापालिकेत भरण्यास सहा वर्षांसाठी अपात्र केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.