Pimpri: कोरोनामुळे पिंपरीगाव, काळेवाडी फाटा ‘सील’

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पिंपरीगाव, काळेवाडी फाटा हा परिसर आज (मंगळवारी) रात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. या परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.

पिंपरी गावातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट काल (सोमवारी) आले आहेत. तर, काळेवाडी फाटा येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा परिसर सील करण्यात येणार आहे.

हा परिसर सील
सेक्टर नंबर 224/1 तपोवन मंदिर रोड पिंपरीगावातील सुखवानी सिटी-वोडाफोन स्टोअर्स-नंदकिराणा स्टोअर्स, ज्ञानेश्वर जनरल स्टोअर्स, कापसे चौक, माउली चहा, वाडेकर मिसळ, सुखवानी सिटी

16 नंबर बसस्टॉप काळेवाडी फाटा, वाकड (प्रोक्स सॉफ्टवेअर, प्रा. लि. औंध-रावेत बीआरटी रोड, प्रेमकुल्फी, इंडियन बँक, अक्षय पार्क) हा परिसर सील करण्यात येणार आहे. या परिसरात पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली आहे.

सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.