Pimpri: कोरोनामुक्त रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे

Pimpri: Corona-free patients should come forward to donate plasma

एमपीसी न्यूज – कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्लाझ्मा दान करण्यासाठी स्वतः आणि इतरांनाही पुढे आणावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे डॉ. तुषार पाटील यांनी केले आहे.

प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देण्यासाठी उपयुक्त आहे. शहरात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. साडेसात हजारहून अधिक जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

परंतु, प्लाझ्मा दान करणारे 15 ते 20 म्हणजे अत्यल्प आहेत. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून 28 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणताही रूग्ण प्लाझ्मा दान करू शकतो.

एका वेळेस एक रूग्ण 400 ते 500 मिली प्लाझ्मा दान करू शकतो. 15 दिवसांच्या अंतराने 2-3 वेळेसही प्लाझ्मा दान करू शकतो. प्लाझ्मा दान केल्याने रूग्णाला कोणताही त्रास होत नाही.

मात्र, प्लाझ्मा दान केल्याने कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतो. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मा दान करण्यास पुढे यावे.

तसेच लॉकडाऊनमुळे कुणाला वायसीएम रुग्णालय रक्तपेढीत येण्यास अडचण येत असेल त्यांनी वायसीएम रुग्णालय रक्तपेढीत 020-67332389 या नंबरला कॉल करा, असे आवाहन डॉ. तुषार पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.