Pimpri: प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांनी पुढे यावे- आयुक्तांचे आवाहन

Corona-free patients should come forward to donate plasma- Commissioner's appeal : प्लाझ्मा डोनर म्हणून वायसीएम रुग्णालयाकडे नोंदणी करावी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनाचे अनेक रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. या कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा डोनर म्हणून वायसीएम रुग्णालयाकडे नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. प्लाझ्मा मिळाल्यास जेणेकरुन नवीन रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त आहे.

आजपर्यंत शहरातील साडेनऊ हजार जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. या रुग्णांनी आपला प्लाझ्मा  दान करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

आयुक्त हर्डीकर आपल्या आवाहनात म्हणतात, कोरोनाच्या लढ्यात पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णांची चांगली सेवा करत आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने उपचार देण्यात येत आहेत.

त्यामधील एक महत्वाचा उपचार म्हणजे प्लाझ्मा थेरपी आहे. वायसीएममध्ये थेरीपीला सुरुवात केली आहे.   जे रुग्ण कोरोनाग्रस्त झाले त्यांनी समर्थपनाने कोरोनाचे आव्हान पेलले आणि ते बरे होऊन घरी गेले आहेत.
अशा रुग्णांकडूनच हा प्लाझ्मा गोळा करावा लागणार आहे.

प्लाझ्मा हा रक्ताचा एक भाग आहे. त्यामुळे जे  पॉझिटीव्ह झाले आणि बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांच्याकडून प्लाझ्माची आवश्यकता आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी  प्लाझ्माचे डोनर व्हावे. रक्तदान करावे. जे प्लाझ्मा देवू इच्छित आहेत. त्यांनी  वायसीएम रुग्णालयात  रक्तगटासह नोंदणी करावी.

पालिकेच्या वेबसाईटवर देखील कुठे नोंदणी करायची याचे वेब पेज दिले जाईल. त्यासोबतच पीसीएमसी स्मार्ट सारथी या ॲपवर देखील प्लाझ्मा डोनर म्हणून नोंदणी करता येईल. त्यामध्ये रक्तगट नमूद केला  तर  गंभीर रुग्णाला ज्यावेळी गरज पडेल  त्यांना तुमच्या रक्तदानाने जीवनदान मिळणार आहे.

त्यामुळे पॉझिटीव्ह झाले आणि चांगल्या रितीने बरे होऊन घरी गेले आहेत त्यांनी प्लाझ्मा डोनर म्हणून वायसीएम रुग्णालयाकडे नोंदणी करावी. जेणेकरुन नवीन रुग्णांना चांगल्या पद्धतीने सेवा देता येईल, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.