Pimpri: कोरोना; ‘वर्क फ्रॉम होम’ कितपत शक्य?

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आयटी कंपन्यांसह विविध आस्थपनातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मूभा देण्यास सांगितले जात आहे. पण, सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात ‘वर्क फ्रॉम होम’ अशक्य आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचारी घरुन काम करु शकतात. पण, आयटी क्षेत्राशी निगडीत बँकिंग क्षेत्र, कॉल सेंटर, विविध उत्पादने निर्माण करणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरुन काम करणे शक्य नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी बाहेर पडावेच लागत आहे. ‘लॅपटॉप’चा देखील तुटवडा आहे.  लॅपटॉपउपलब्ध होत नसल्याने घरुन काम करताना अडचणी येत आहेत.

महाराष्ट्रात जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आजपर्यंत कोरोनाची लागण झालेले तब्बल 49 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण आहे. पुढील दिवस अत्यंत महत्वाचे असल्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून आयटी कंपन्यांतील सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. इतर कंपन्यांनी देखील 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवावे, अशा सरकारच्या सूचना आहेत. तथापि, अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ करणे अशक्य आहे.

आयटी कंपन्यांची बहुतांश कामे ऑनलाईन चालतात. त्यांचे बहुतांश व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतो. त्यामुळे आयटी कंपन्यांमधील कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करणे शक्य आहे. परंतु, कॉल सेंटर, बँकिंगशी निगडीत आयटी कंपन्या, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करणे अशक्य आहे. बँकेचे अनेक व्यवहार कागदोपत्री होत आहेत. तर धनादेश जमा करणे, पैशांचा भरणा करण्याची कामे ऑफलाईन केली जातात. ऑनलाईन सुविधा आहे. पण, अनेक नागरिक ऑनलाईन सुविधेचा वापर करत नाहीत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात यावेच लागते. तसेच कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना घरुन काम करता येत नाही. त्यांना कार्यालयात यावेच लागते.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. शहरात विविध उत्पादने घेणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरुन काम करणे शक्यच नाही. काम नाही केले तर, पगार मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कंपन्यांमधील कामगारांना ‘वर्क फ्रॉम होम’ करणे अशक्य आहे. त्याचबरोबर एमआयडीसीतील लघुउद्योजकांना देखील घरुन काम करणे अशक्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.