Pimpri: शहरात ‘या’ भागात आहेत कोरोना बाधित रुग्ण; 57 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संशयित 57 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, आजपर्यंत 37 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरातील पुनावळे, ताथवडे, भोसरी, पिंपळेसौदागर, मोशी,  थेरगाव, खराळवाडी,  घरकूल-चिखली, दिघी,  दापोडी आणि कासारवाडी परिसरातील पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. सोमवारी रात्री पॉझिटीव्ह आलेले रुग्ण खराळवाडी भागातील आहेत.  

पिंपरी-चिंचवड शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. मागील सहा दिवसांत तब्बल 17  नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 24 वर पोहचली आहे. 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 37  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 24 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 21 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 71

#पॉझिटीव्ह रुग्ण – 00

#निगेटीव्ह रुग्ण – 57

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 71

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 92

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 57

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 37

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 24

#वायसीएममध्ये 21 तर पुण्यात तिघांवर उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  1

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 12

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 13166

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 39913

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.