Pimpri Corona Update: दिवसभरात शहरात 125 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 1057 वर

125 persons tested positive to coronavirus in city today, 2 deaths, total COVID patients till date 1057

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 125 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय शहराबाहेरील तिघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. ही आजपर्यंतची सर्वांत मोठी रुग्णवाढ आहे. कासारवाडीतील 62 वर्षीय वृद्ध आणि खराळवाडीतील 60 वर्षीय महिला अशा दोघांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पालिकेच्या डॅशबोर्डवरची रात्री दहापर्यंतची ही आकडेवारी आहे. शहरातील 1057 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील भाटनगर, पिंपरी, दापोडी, वाकड, आनंदनगर चिंचवड स्टेशन, साईबाबानगर, खराळवाडी, नेहरुनगर, काळभोरनगर, काळेवाडी, नाणेकर चाळ, पिंपरी रेल्वे स्टेशन, बौद्धनगर पिंपरी, चिंचवडगाव, भोसरी, अजंठानगर, वाल्हेकरवाडी, दिघी बोपखेल, मोरवाडीतील 86 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 46 पुरुष आणि 40 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, सातत्याने अपडेट होणा-या पालिकेच्या डॅशबोर्डवर दिवसभरात शहरातील 125 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. रात्री दहा वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

शिवाय शहराबाहेरील औंध, चाकण आणि केंदुर पाबळ येथील तीन पुरुषांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. असे दिवसभरात एकूण 128 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, कासारवाडीतील 62 वर्षीय वृद्ध आणि खराळवाडीतील 60 वर्षीय महिला अशा दोघांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला.

तर, आनंदनगर, सद््गुरुनगर वाकड, जुनी सांगवीतील उपचाराला दहा दिवस पुर्ण झालेल्या व कोणतेही लक्षणे नसलेल्या 10 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आज गुरुवारपर्यंत 1057 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 519 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 18 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 19 अशा 37 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 513 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 205

# पॉझिटीव्ह रुग्ण – 125

#निगेटीव्ह रुग्ण – 3

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 276

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 764

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 117

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1057

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 520

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 37

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 519

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 18965

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 58778

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.