Pimpri: दिवसभरात 49 जणांना कोरोनाची लागण; 38 जणांना डिस्चार्ज

49 corona positive patients today; 38 persons discharged.

मोशीतील महिलेचा YCMH मध्ये मृत्यू, रुग्णसंख्या पोहोचली 1373 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 49 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, मोशीतील 60 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला.  आजपर्यंत शहरातील 1373 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील शिंदेनगर -जुनी सांगवी, यमुनानगर, पंचतारानगर -आकुर्डी, विशाल इस्क्वेअर – पिंपरी, संत तुकारामनगर भोसरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, शास्त्रीनगर, रमाबाई नगर, वैभवनगर, साईबाबानगर – चिंचवड, वाल्हेकरवाडी, आनंदनगर पिंपळेगुरव, गुलाबनगर दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाही नगर दिघी, तालेरानगर चिंचवड, पिंपरी, पिंपळेसौदागर, बौध्दनगर पिंपरी परिसरातील 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 28 पुरुष आणि 15 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय वडगावशेरी, म्हाळुंगे, देहूरोड, येरवडा, आंबेगाव, कोथरूड येथील चार पुरुष आणि दोन महिलांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळेगुरव, पिंपरीगाव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एमबी कॅम्प किवळे, खंडोबामाळ, दिघीरोड भोसरी, दत्त मंदिर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या, तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 38 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1373 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 829 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 24 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 20 अशा 44 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या 513 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 823

# पॉझिटीव्ह रुग्ण – 49

#निगेटीव्ह रुग्ण – 579

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 475

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 570

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 596

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1373

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 513

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 44

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 829

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 18967

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 59877

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.