Pimpri: दिवसभरात कोरोनाचे 115 नवे रूग्ण; चार जणांचा मृत्यू

Corona infestation of 115 people during the day; Four people died

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील आणि महापालिका हद्दीबाहेरील एकूण 115 जणांचे आज (सोमवारी) अहवाल पाॅसिटिव्ह आले आहेत. तर, संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी 52 वर्षीय महिला, दापोडी 52 वर्ष, बोपोडीतील 70 वर्षीय महिला आणि खडकीतील 79 वर्षीय वृद्ध अशा चार जणांचा आज एकाचदिवशी कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. 

तर, बरे झालेल्या 20  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत शहरातील 1897 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 785  इतकी आहे. 

महापालिकेच्या कोवि-19  डॅशबोर्डवरील आज, सोमवारी रात्री 9.30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 20 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1897 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1079 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 33 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 24 अशा 57 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७85 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.