Pimpri: दिवसभरात 98 जणांना कोरोनाची बाधा; चार जणांचा मृत्यू, 11 रुग्णांना डिस्चार्ज

Corona infestation of 98 people during the day; Four killed, 11 discharged

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 94 आणि महापालिका हद्दीबाहेरील 4 अशा 98 जणांचा वैद्यकीय अहवाल आज (सोमवारी) कोरोना पॉझिटिव्ह आला. तर, संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी, दापोडी, बोपोडी आणि खडकीतील एक अशा चार जणांचा आज एकाचदिवशी कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर, बरे झालेल्या 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत शहरातील 1863 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील परिसरातील रुग्ण जुनी सांगवी, कामगार भवन पिंपरी, शंकरनगर, अंजठानगर, पिंपळेनिलख, पिंपरी, दत्तनगर, तापकिरनगर काळेवाडी, नढेनगर काळेवाडी, मधुबन सोसायटी जुनी सांगवी,संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी, सुदर्शननगर चिंचवड, मोरेश्वर कॉलनी थेरगांव, सृष्टी हॉटेल पिंपळे गुरव, विशालनगर पिंपळे निलख,सिध्दार्थनगर दापोडी, काटेपुरम चौक पिंपळे गुरव, कोकणेनगर काळेवाडी, नाशिक हायवे मोशी, दिघीरोड भोसरी, बोपखेल, विशालनगर पिंपळेनिलख, किनारा हॉटेल दापोडी, मोरयापार्क पिंपळेगुरव, पिंपरी, नवभारतनगर दापोडी, संभाजीनगर चिंचवड, सोनिगरा चिंचवड, आदर्शनगर काळेवाडी, पाटीलनगर चिखली, इंदिरानगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, नानेकरचाळ पिंपरी, वल्लभनगर पिंपरी, जयभीमनगर दापोडी, मोशी, पंचतारारोड आकुर्डी, सिंधुनगर प्राधिकरण, नेहरुनगर, विजयनगर काळेवाडी, महात्मा फुलेनगर भोसरी, वैशालीनगर पिंपरी, संततुकारामनगर,आकुर्डी,चिंचवड स्टेशन,दत्तमंदीर वाकड, थेरगांव परिसरातील 94 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 55 पुरुष आणि 39 महिलांचा समावेश आहे.

तर, बोपोडी, देहूगांव, देहूरोड, मंगळवारपेठ येथील दोन पुरुष, दोन महिला अशा चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीसीएमसी बिल्डिंग अजंठानगर,पीसीएमसी बिल्डिंग निगडी,आनंदनगर चिंचवड,बौध्दनगर पिंपरी, भिमाशंकर नगर दिघी, लिंबोरेवस्ती दापोडी, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, निगडी, पारोळा जळगांव, कसबापेठ पुणे येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 11 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1863 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1070 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 33 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 24 अशा 57 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 763 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 163
# पॉझिटीव्ह रुग्ण – 98
#निगेटीव्ह रुग्ण – 204
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 286
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 927
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 228
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1863
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 763
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 57
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1070
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 20985
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 67531

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.