Pimpri: कोरोनाची माहिती आता ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’मोबाईल अँपवर मिळणार

महापालिकेचे नागरिकांच्या सेवेसाठी अँप दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध शंकांचे निरसण व्हावे, कोरोना विषाणूची लक्षणे काय आहेत? त्याकरीता कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी. याबाबत सरकारच्या सूचना, जिल्हाधिका-यांचे आदेश याची संपुर्ण माहिती आता शहरवासीयांना ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’मोबाईल अँपवर मिळणार आहे. हे अँप हा गुगल प्ले स्टोअरवरून एन्ड्राईड मोबाईलधारकांसाठी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेने आज (मंगळवारी) हे अॅप नागरिकांच्या सेवेत दाखल केले आहे.

याबाबतची माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’मोबाईल अँप गुगल प्ले स्टोअरवरून एन्ड्राईड मोबाईलधारकांसाठी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे अँपल युजर्सकरीता हा मोबाईल अँप, अँप स्टोअरवर उपलब्ध आहे. अँप डाऊनलोड करण्यासाठी ‘PCMC Smart Sarathi’ या नावाने सर्च करावे. मोबाईल अँप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर या अॅपवर ‘रजिस्ट्रेशन’(नोंदणी) करून अॅपचा वापर करता येईल.

या अँपद्वारे नागरिकांना कोरोनाची चेकलिस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. चेकलिस्टद्वारे या विषाणूच्या लक्षणाबाबत एकूण 13 प्रश्न विचारण्यात आले आहेत. उत्तरे दिल्यानंतर महापालिकेस नागरिकांची आरोग्य विषयक संपुर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी या नागरीकांशी व्यक्तीश:ह संपर्क साधून वैद्यकीय उपचाराबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करतील. हा अँपचा वापर केल्याने नागरिकांस तत्काळ सेवा/वैद्यकीय मदत उपलब्ध होऊन कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मदत होईल. तसेच याव्यतिरिक्त वेळोवेळी मोबाईल अँपद्वारे घरीबसून नागरिकांना जास्तीत-जास्त सेवा भविष्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गुगल प्ले द्वारे मोबाईल अँप डाऊनलोड करण्याकरीता https://play.google.com/store/apps/details?id=com.dataapp&hl=en_IN या लिंकवर जावे. मोबाईल अँपद्वारे देण्यात येणा-या सुविधेचा शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी उपयोग करावा. हा मोबाईल अँप डाऊनलोड करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like