Pimpri: कोरोना लक्षणे विरहित रुग्णांकडून प्रसाराची शक्यता कमी, त्यांनी घरीच ‘आयसोलेट’ व्हावे – आयुक्त हर्डीकर

Corona is less likely to spread from asymptomatic patients, they should be isolated at home: Commissioner Hardikar

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तशी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. कोरोनाग्रस्त पण काहीच लक्षणे नसलेल्या रुग्णांची विषाणूचा प्रसार करण्याची क्षमता कमी आहे. त्यांनी स्वत:ला वेळीच क्वारंटाईन करुन घेतल्यास त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रसार होणार नाही. त्यासाठी लक्षणे नसलेल्या आणि ज्यांना घरात विलगीकरण शक्य असेल त्यांनी घरातच विलगीकरण व्हावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध ठेवण्याकरिता लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घरीच विलगीकरण करण्याची मानसिक तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

‘कोरोना सोबत जगताना, लढा कोरोनाशी संवाद नागरिकांशी’ या मोहिमेअंतर्गत आयुक्त हर्डीकर यांनी आज (शनिवारी) फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, मार्च, एप्रिल आणि मे शहरातील परिस्थिती नियंत्रणात होती. अर्धा मे महिना अत्यंत चांगले नियंत्रण राहिले. मात्र, लॉकडाउन शिथील केलेल्यानंतर कोरोनाने डोकेवर काढले.

पाहता-पाहता कोरोनाची रुग्णसंख्या 2638 वर जाऊन पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास 1 हजार आहे. तरी देखील घाबरण्याचे कारण नाही. त्यात 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. आजपर्यंत केवळ 43 जणांचे मृत्यू झाले आहेत. शहरात कोरोनाचा मृत्यूदर 1.7 टक्के आहे.

सध्या शहर अनलॉकमध्ये असल्याने रुग्णांची संख्या वाढत जाणार आहे. कोरोना आपल्यातून गेला नाही. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कायमस्वरुपी सतर्क राहायचे आहे. जस-जशी रुग्णांची संख्या वाढत आहे. तस-तशी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाग्रस्त आहे पण कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत अशा रुग्णांकडून विषाणूचा प्रसार होण्याची क्षमता कमी आहे. त्यांनी लक्षणे नसताना काळजी घेतली. स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले, तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रसार होणार नाही. पण, ज्यांना लक्षणे आहेत. श्वासनाचा त्रास होत आहे. अन्य दुर्धर आजार आहेत. त्यांना निमोनियाचा आजार बळावणे. त्यातून श्वास घेण्यास त्रास होणे आणि त्यातून ऑक्सीजनची गरज पडणे याची संख्या देखील वाढत आहे.

या रुग्णांसाठी बेड शिल्लक ठेवायचे असतील, तर पॉझिटीव्ह पण काहीच लक्षणे नाहीत अशा रुग्णांची कोविड केअर सेंटरमध्ये सोय करावी लागेल. किंवा अशा रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला लागली, तर केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांनुसार त्यांना घरातच विलगीकरण करावे लागेल. सगळ्यांनी गृह विलगीकरणाची मनाची तयारी करायला पाहिजे. तरुण, शरीर चांगले, प्रतिकार शक्ती चांगली असेल तर कोरोनाला चांगल्याप्रकारे सामोरे जाता येते.

80 टक्के लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत. त्यामुळे कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना रुग्णालयातील बेड देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी केवळ स्वत:ला अन्य लोकांपासून 17 दिवसांसाठी विलगीकरण करायचे आहे. वेगळे रहायचे आहे. त्यासाठी महाविद्यालयांची हॉस्टेल ताब्यात घेतली आहेत. त्यांना त्याठिकाणी ठेवले जात आहे. मात्र, सुविधा निर्माण करण्यास बंधने आहेत.

ज्यांना घरात विलगीकरण शक्य असेल त्यांनी घरातच विलगीकरण व्हायचे आहे. त्यालाच होम आयसोलेशन म्हटले जाते. घरात एका व्यक्तीला एकटे राहण्यासाठी एक खोली आवश्यक आहे. त्याला जोडून स्वच्छतागृह, बाथरुम असावे. अशी खोली असल्यास बिनधास्तपणे होम आयसोलेशन करु शकता. त्याची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण, आपल्यात लक्षणेच नाहीत. त्यामुळे आपल्याकडून विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाही.

केवळ काही बंधने पाळावी लागतील. खोलीत बंदिस्त रहावे लागेल. खोलीत मास्क घालून रहावे. त्यामुळे सौम्य लक्षणे असतील. तर, मुखावाटे बाहेर पडणारा द्रव इतरत्र पसरु नये याची दक्षता घेतली जाईल. 17 दिवस पूर्णपणे बंदिस्त रहायचे आहे. चांगले, सकस, विविध जीवनसत्व असलेला आहारा घ्यावा. जेवणाचे आपले ताट, कपडे रुग्णाने धुवावेत, असेही आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.