Pimpri : कोरोना ही चीनची उत्पत्ती ; चायनीज वस्तूवर बहिष्कार घाला – शिवशाही व्यापारी संघ

एमपीसी न्यूज -कोरोना साथीचा आजाराचा विचार करता चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाका,  असे आवाहन शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोरोना ही चीनची उत्पत्ती आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. बाजारात मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मदतीला देशी उद्योजक धावून आले.

सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी तसेच नागरिकांनी सुद्धा घेतली पाहिजे. त्यासाठी स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजेत. देशी कंपन्यांना चालना देण्यासाठी उपयुक्त असे निर्णय केंद्र व राज्य सरकारने घ्यावेत.

नागरिकांनी स्वदेशी वाहने वापरण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा तसेच चीनमधील वस्तूंची खरेदी करणे टाळावे. चिनी बनावटीची कोणतीही वस्तू नागरिकांनी खरेदी करू नये, असे आवाहन दाखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.