Pimpri: कोरोनामुळे एकाचदिवशी चार जणांचा मृत्यू; बळींची संख्या 24 वर

Corona kills four in one day; The death toll rose to 24

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा कोरोनामुळे आज (मंगळवारी)  मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन अशा चार जणांचा समावेश  आहे. यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या 24 वर गेली आहे.

शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी आणि काही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एकाचदिवशी चार जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील 10 तर हद्दीबाहेरील पण महापालिका रुग्णालयात 14 जणांचा अशा एकूण 24 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला  आहे.

मृतांमध्ये  दापोडी येथील  52 वर्षीय महिला, दौंड येथील 65 वर्षीय महिला,  आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथील  40 वर्षीय महिला आणि पुण्याच्या मंगळवार पेठेतील 79 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शहरातील 21 रुग्णांची प्रकृती गंभीर

आजपर्यंत शहरातील 559 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 282 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आजमितीला शहरातील 269 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

त्यापैकी 98 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. 21 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, 138 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण, त्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.