Pimpri Corona Update : सोमवारी शहरात 44 नवीन रुग्ण; 107 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी, दि. 25) दिवसभरात 44 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 75 हजार 822 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 71 हजार 451 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 485 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 617 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 264 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 353 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 8 हजार 416 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 22 लाख 49 हजार 824 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.