Pimpri Corona Update : रविवारी शहरात 54 नवीन रुग्ण; 54 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 17) दिवसभरात 54 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 75 हजार 334 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 70 हजार 710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 882 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 565 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 317 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 15 हजार 901 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजवर शहरातील 21 लाख 63 हजार 46 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.