Pimpri Corona Update: निचांकी रुग्णसंख्या! शहरात आज 33 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख चांगलाच उतरणीस आला आहे. शहराच्या विविध भागातील 33 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. गेल्या नऊ महिन्यांतील आजची रुग्णसंख्या सर्वांत निचांकी आहे. रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 474 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 75 हजार 367 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 830 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 490 रुग्ण गृहविलगीकरणात असून 340 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 37 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 356 आहेत. आज दिवसभरात 9 हजार 807 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 21 लाख 72 हजार 853 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.