Pimpri : सोशल मीडियावर मिम्सद्वारे ‘कोरोना’ची ‘खिल्ली’!

एमपीसी न्यूज – चीनमधून सुरु झालेला कोरोना व्हायरसने 114 देशांची यात्रा केली आहे. आता कोरोना भारतातही दाखल झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यावर औषध शोधण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. घातक असलेल्या विषाणूला वैद्यकीय विभागाकडून लस निघेल तेंव्हा निघेल. पण नेटक-यांनी कोरोना चांगलाच झोडून काढला आहे. वेगवेगळ्या मिम्सच्या माध्यमातून कोरोनाची खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडियावर पसरल्या जाणा-या अफवांमुळे एखाद्या घटनेचे गांभीर्य वाढते. पण वाढलेले हे गांभीर्य कमी करण्याचा उपाय देखील याच सोशल मीडियावर उपलब्ध आहे. मिम्स आणि खिल्ली उडवणा-या मेसेजेसमधून हे गांभीर्य कमी केले जाते. सध्या जगभर घोंघावणा-या कोरोनाबाबत भारतात अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने देखील एक मिम्स पोस्ट केले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील एका दृश्यावर हे मिम्स आधारित आहे.

केवळ मिम्सच नाही तर कोरोनावर आधारित चक्क गाणी सुद्धा बनवण्यात आली आहेत. लग्नाच्या वरातीत ही गाणी लावली जात असून त्यावर तरुणाई थिरकतानाचे व्हिडिओ आणि अनेक गाणी सध्या सोशल मीडियामधून व्हायरल होत आहेत.

काही निवडक मिम्स…..

# मलेरिया के मच्छर ने अपने बेटे से कहा….. ‘Corona का कोर्स कर पगले, उसमें करियर है …..!

# तो देवळात गेला
गुरूजी, करोनाची खूप भीती वाटतेय
गुरुजी : भिऊ नकोस, हात पुढे कर आणि हे घे
तो : गुरूजी तीर्थ पिऊन कसंतरीच होतय
गुरुजी : प्यायलास की काय बावळटा, सॅनीटायझर होतं ते !

# आता साधं सर्दी ताप आला तरी लोकं कोरोनाचा संशयित म्हणून एकमेकांकडे बघत आहेत

# गर्लफ्रेंड – तू मला रात्री कॉल केलाच नाही, आता मी तुझ्याशी नाही बोलणार
बॉयफ्रेंड – मी तुला रात्री कॉल केला होता. पण तुझे बाबा कॉल उचलत होते. त्यांना खुप खोकला झालाय. मी तीनवेळा कॉल केला. पण ते उचलत होते आणि खोकत होते
गर्लफ्रेंड – अरे वेड्या, ती कोरोनाची डायलर टोन आहे. कॉल केल्यावर ऐकू येते

# प्रत्येक शतकातील विसावं वर्ष धोक्याचं ….
1720 – प्लेग
1820 – कॉलरा
1920 – फ्ल्यू
2020 – कोरोना

# सगळे किटाणू, जर्म्स मारणारे साबण, सनिटायझर, फ्लोअर क्लीनरच्या जाहिरातीत 99.99 टक्के किटाणू मेल्यानंतर भिंगातून राहिलेला एक किटाणू दाखवतात ना…… तोच कोरोना आहे.

# कोरोनाची साथ आहे म्हणून खोकल्याची कॉलर ट्यून ठीक आहे.
उद्या जुलाबाची साथ आल्यावर काय करतील, याची खरी भीती आहे.

# ‘मला काय नाय होत’ म्हणून उगाच चौकात उभे राहून फुकटची शायनिंग मारू नका
योग्य काळजी घ्या, शायनिंग मारायला ती ‘करिना’ नाही ‘कोरोना’ आहे.
”जनहितार्थ जारी”

# आज N95 मास्क आणला, त्यावर बघतो तर काय ‘Made in China’
म्हणजे अंधाराची भीती वाटते म्हणून भुताचा हात धरून चालण्यासारखे आहे.

# जळगांव पर्यटनस्थळ होणार
करोना व्हायरस 40 अंश सेल्सियसमध्ये जिवंत राहत नाही.
त्यामुळे लोक आता कुल्लू मनालीला न जाता धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ अशा ठिकाणी उष्ण पर्यटनाला येतील.

# कुछ दिन बाद
जान हैं तो जहाँ हैं
जिना है तो
चलो खानदेश

# जर तुम्हाला नॉर्मल सर्दी, ताप, खोकला झाला असेल तर,
जिवंत राहण्यासाठी भारतीय न्यूज चॅनल पाहू नका.
नाहीतर भीतीमुळेही तुम्ही मरू शकता

# स्थळ – पुणे
ग्राहक – डेटॉल साबण आहे का ?
दुकानदार – हो, आहे
ग्राहक – तर मग डेटाॅल साबणाने हात धुवून एक किलो रवा द्या.

# स्थळ – पुन्हा पुणे
चोरी होऊ नये म्हणुन एका घरावर लावलेली पाटी –
“घरमालक कालच चीन दौ-यावरून परत आले आहेत.”

# पुण्यात, मुंबईत राहणाऱ्या लोकांनी यंदा जत्रा, यात्रा, उन्हाळ सुट्टीला गावाकडं यायची तसदी घेऊ नये,
वाटल्यास ज्वारी, बाजरी, गहू, डाळी पोच केल्या जातील. पण हिकडं फिरकू नका.
गावाकडची समदी खुशाल हायती. काळजी करू नये.

# Leave Letter….

Dear HR,
I am suffering from corona virus and request you to grant me paid leave for 20 days.
Otherwise I will come to office.

Reply from HR

Dear Sick Employee,
After knowing that you are infected, we have asked all employees to work from home. you can come to office and start working.
No leaves !

From HR dept.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.